आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना वृद्ध कलावंतांचे निवेदन
प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आमदारांनी दिल्या सूचना
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक ७ जुलै चामोर्शी
राज्य सरकारने वृद्ध कलावंतांना मानधन लागू केल्याने अनेक कलावंतांनी मानधन मिळावे याकरिता शासन स्तरावरती अर्ज केलेले आहेत परंतु जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणे अजूनही निकाली काढलेली नाही त्यामुळे या वृद्ध कलावंतांवर प्रचंड अन्याय होत आहे. करिता प्रलंबित असणारे वृद्ध कलावंत मानधनाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावी अशी मागणी वृद्ध कलावंतांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेकडे केली आहे
*याप्रकरणी आमदार महोदयांनी या प्रलंबित प्रकरणांना तात्काळ निकाली काढून वृद्ध कलावंतांना न्याय द्यावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे*
*यावेळी निवेदन देताना हरिभक्त परायण जीवनदास महाराज ,रमेश कुमरे , धिवरू गेडाम, सुदर्शन हजारे, विजय शेंडे, रवी वासेकर , बंडू गव्हारे , वामन किनेकर यांचे सह कलावंत उपस्थित होते









