ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २९ : येथील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ वाहनाची ट्रॅव्हल्सशी धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.ही घटना रविवार (ता. २९) सायंकाळी ६.४५ वाजता घडली.
प्राप्ता माहितीनुसार गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. एमआच ४६ पी ५३९२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनात एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभिडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या एमएच १५ सीके ५००५ या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची टार्निंगवर जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
—————————–










