नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा केला सत्कार

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. ३१ : गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, स्वीकृत नगरसेवक सागर निंबोरकर तसेच गडचिरोली शहरातील आशीर्वादनगर येथून निवडून आलेले राष्ट्रवादी पक्षाचे रवींद्र मेश्राम व काँग्रेस पक्षाच्या मेघा वरगंटीवार यांचा आशीर्वादनगरतर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशीर्वादनगरचे डॉ, काशिनाथ भडके होते. सर्वप्रथम स्व. गीता हिंगे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. सत्कार समारंभात आशीर्वादनगरच्या विविध समस्या विशद करण्यात आल्या. तसेच आशीर्वादनगरच्या ओपन स्पेसच्या विकासासाठी मागणी करण्यात आली. नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासावर दृष्टीक्षेप टाकून पुढील विकासाची रूपरेषा विशद केली. त्यासोबतच आशीर्वादनगरच्या विकासाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले, या कार्यक्रमाला आशीर्वादनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

——————–