छत्तीसगड येथून गडचिरोली निघालेली खासगी प्रवासी बस उलटली, १८ प्रवासी जखमी

45

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : येथील धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगाव जवळ छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून १८ प्रवासी जखमी झाले, यामधील तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवार (ता. २४) दुपारी १२.४५ वाजता घडली

नीलकंठ वाळके (वय ५८ रा. मारोडा), चांदणी रामटेके (वय २३ रा. तोरगाव) तसेच चालक रवी चावरे (३५ रा. दल्,ली छत्तीसगड) हे तिघे अधिक जखमी असल्याने त्यांना गडचिरोली रेफर करण्यात आले. दल्ली छत्तीसगड येथून गडचिरोलीकरिता सकाळी दररोज सकाळी ९ वाजता ही ट्रॅव्हल्स चालते. रविवारी चालक व वाहकासह ३६ प्रवासी घेऊन ट्रॅव्हल्स गडचिरोलीकडे जात असताना वडगावजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यावेळी एकच गोंधळ उडाला. बसमधील जखमी प्रवाशांचा आरडा ओरड ऐकून स्थानिक नागरिक तसेच घटनेची माहिती होताच पोलिस प्रशासन धानोरा येथील भाजप पदाधिकारी यांनी तत्परता दाखवत त्वरित धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली व रुग्णवाहिकेने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बस उलटली तो रस्ता अतिशय खराब असल्याने बसचा वेग अतिशय कमी होता. तसेच बस उलटून सुदैवाने एका झाडाला अडकली अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. बसचा चालक मद्य प्राशन करून असल्याचे प्रवाशांनी सांगितले. जखमींची नावे कृष्ण निमगडे (वय ६९, रा. मारोडा) बंडू खोब्रागडे वय ६३ रा. मारोडा, मिष्टी नरोटे (वय १०, रा.र्ष मोवाड) चांदणी साहू (वय २९रा. कोरची) पंचराम पटेल (वय ५५ रा. चंद्रपूर), देवदास झगराह (वय २२ रा. कोरची), उदय देवांगण (वय ५०, रा. चंद्रपूर), ललिता साहू (वय ३८ रा. चंदन बेवडी), जानको पोया (वय ५५ रा. मोवाड), लता नरोटे (वय ५५, रा. मोवाड), भूपेंद्र साहू (वय ४५ रा. कोरची), गुलाबो पटेल (वय ६० रा. शिवणी), शेखर उईके (वय २९ रा. अंतगड) गोपीचंद कुणबी (वय ३३ रा. दल्ली) प्रदीप कुमार आदींचा समावेश आहे.

——————————–