आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले हलदार परीवाराचे सांत्वन ग्लोबल गडचिरोली न्यूज,

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : बहादूरपूर येथील अनुप हलदार यांचे नुकतेच निधन झाल्याने हलदार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबद्दल माहिती मिळताच आमदार डॉ. देवराव होळी यांनी बहादूरपूरला धाव घेत हलदार परीवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मृत अनुप हलदार त्याच्या परीवारातील कमवता मुलगा होता. त्याचा मृत्यू झाल्याने परीवाराची मोठी हानी झाली. आपल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. आपल्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहिल, असे म्हणत आमदार डॉ. देवराव होळी यांनी हलदार परीवाराचे सांत्वन केले. यावेळी अनिल हलदार, त्यांच्या परिवारातील सदस्यांसह रीता हलदार, मंटू मालाकार, जगन्नाथ हलदार, कांताराम मंडल, दिनेश हलदार, राजू हलदार, उत्तम घरामी, अजित बाला, संजित हलदार, कल्पना घरामी आदी उपस्थित होते.