नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन परतणाऱ्या जवानांवर गोळीबार, प्रत्युत्तरादाखल आणखी एक नक्षलवादी ठार .

156

चकमकीत आत्ता पर्यंत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २५ मे

 छत्तीसगड राज्यातील सुकमा परीसरात १८ मे रोजी झालेल्या चकमकीत ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. .शनिवारी १८ मे रोजी सकाळी सुकमा जिल्ह्यात डीआरजी सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी पण ठार झाला. जवानांनी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह नक्षल साहित्य जप्त केले. पोलमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंजारापारा येथील जंगल नाल्यादरम्यान ही चकमक झाली. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नारायणपूर पोलिसांनी २ नक्षलवाद्यांचे मृतदेह, तर अबुझमाड पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला आहे. बिजापूर, दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमाड भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.अबुझमाड येथील रेकावाया भागात मोठ्या कॅडरचे नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस दलाने संयुक्त कारवाई सुरू केली. ज्यामध्ये दंतेवाडा, बस्तर आणि नारायणपूर जिल्ह्यातील १ हजाहून अधिक डीआरजी आणि एसटीएफचे जवान अभियानावर गेले होते.शुक्रवारी जवान नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी जवानांच्या पथकावर गोळीबार सुरू केला. एसटीएफच्या जवानांनीही तत्परतेने पोझिशन घेतली आणि सुरक्षित कव्हर घेत प्रत्युत्तर दिले. गोळीबारानंतर एक गणवेशधारी नक्षलवाद्याचा मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली.एकूण ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झालं.

———————————-