गडचिरोलीच्या तरुणाचा मृतदेह आढळला पोर्ल्यात उष्माघात की, घातपात ?

221

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : गडचिरोलीवरून अवघ्या १५ किमी अंतरावरील पोर्ला येथील गजानन महाराज मंदिराजवळ गडचिरोली शहरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोमवार ३ जून २०२४ रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह रितेश नागदेवते (वय४०) रा. रामनगर, गडचिरोली असे मृताचे नाव आहे. गडचिरोलीतील रामनगरचा रहिवासी असलेल्या रितेश नागदेवतेचा मृतदेह पोर्ला ते मोहझरी रस्त्या दरम्यान गजानन महाराज मंदिराजवळ आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रितेश हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता, असे त्याच्या आईने सांगितले. विशेष म्हणजे रितेशच्या अंगावर फक्त चड्डी, बनियानच होते. यावरून त्याच्या घातपाताची शंका व्यक्त होत आहे. तो गडचिरोलीवरून पोर्ला जवळच का गेला असावा, अंगावर कोणत्याच प्रकारच्या जखमा नाहीत, उष्मघात किंवा अतिमद्यप्राशनाने त्याचा मृत्यू झाला का, त्याच्या अंगावरील कपडे कुठे गेले, असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. त्याचा मृत्यूदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करत आहेत.