सावतेली समाज भवनाच्या नाम फलकाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते अनावरण

42

याप्रसंगी स्थानिक आमदार निधीतून किचन शेड बांधकामासाठी 10.00 लक्ष रु. देण्याचे आश्वासन पूर्ण करणार*

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली: दि ,16 जून

 

चामोर्शी : सावतेली समाज भवनाच्या बाजूला समाज भवन बांधकासाठी 13 लक्ष रु. निधी उपलब्ध करून दिला होता दिलेला शब्द पूर्ण करत समाज भवन बांधकाम पूर्ण झाले. तालुक्यात सावतेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात असून या समाज भवनात लग्न सोहळा, नामकरण, वाढदिवस असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात त्यामुळे समाज भवनाच्या खुल्या जागेत किचन शेड बांधकामासाठी 10. 00 लक्ष रु देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी समाज बांधवानी आमदार महोदयांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

यावेळी प्रामुख्याने गजानन भांडेकर, शिलाताई वैरागडे, प्रा. रमेशजी बारसागडे शामराव दूधबळे, नानाजी बुरांडे, परशुराम दूधबावरे, बाबुराव कुकडे, वासुदेव भांडेकर, दिलीप चलाख, जयराम चलाख, काशिनाथ बुरांडे, विनोद खोबे, बंडुजी नैताम किशोर गव्हारे, सुरेश शहा, अरुण गव्हारे, या अनावरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते