गडचिरोली शहरातील तरुणाचा आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन
चामोशी जनसंपर्क कार्यालयातून निघालेली रॅली गडचिरोली जनसंपर्क कार्यालयापर्यंत
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक १५ ऑगस्ट गडचिरोली
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी शहरवासीयांना केले होते. त्या आव्हानाला शहरातील तरुण-तरुणी व मातृ शक्तीचा मोठा प्रतिसाद दिसून आला. ह्या बाईक रॅलीने संपूर्ण गडचिरोली शहर तिरंगामय झाल्याचे दिसून आले. रॅलीची सुरुवात जनसंपर्क कार्यालय चामोर्शी पासून करण्यात आली. ती रॅली गडचिरोली शहरात जनसंपर्क कार्यालयात पोहोचल्यानंतर गडचिरोली शहरातील गांधी चौक, बस डेपो, रामनगर, गोकुळ नगर, आयटीआय बायपास, कारगिल चौक ,हनुमान वार्ड मुख्य बाजारपेठ मार्गे फिरून जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीतील तरुणांचा प्रतिसाद बघता रॅली अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी समारोपानंतर मार्गदर्शन करताना केले.*
तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे तालुक्याचे अध्यक्ष विलासजी भांडेकर, शिंदे गटाचे युवा सेनेचे दीपकजी भारसाकडे , युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे , रमेश नैताम, आकाश नीकोडे , शहरातील महामंत्री विवेक बैस, नरेश हजारे, शहराच्या अध्यक्ष महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता ताई उरकुडे, नगरसेविका वैष्णवी नैताम, निमाताई लाटकर, महिला आघाडीच्या सुषमाताई डोईजड, भाजपा युवा नेते संजय मांडवगडे , हर्षल गेडाम, सुभाष उप्पलवार, रोशन आखाडे, देवाजी लाटकर , प्राध्यापक अरुण उराडे, पल्लवी बारापात्रे, सुंदराबाई कडकाडे, यांचे सह तालुका पदाधिकारी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.