गडचिरोली:
दि ,17/04/2024 रोजी राम जमोत्सव निमित्य कार्यक्रमात हनुमान मंदिर आठवडी बाजार गडचिरोली येथे घेण्यात आला, या कार्यक्रमात कार सेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला, भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्या येथे साकार झाले, हे कार्य ज्यांच्या त्यागामुळे संपन्न झाले अश्या गडचिरोली येथून जाणाऱ्या कार सेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्री रामा चा फोटो देऊन सत्कार करण्यात आला, यामध्ये प्रामुख्याने विजय शेंडे,यमराज बारसागडे,बाबुराव जुवारे, रमेश कोतपल्लिवार,अशोकजी सुर्यवंशी,वसंत कडूकर,बबन सूर्यवंशी,सुशील सुर्यवंशी यांचे सत्कार करण्यात आले.
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी 12.30 वाजता गोपालकाला व प्रसाद वितरित करण्यात आला, कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजपा व काँग्रेस पक्षाचे खासदार साठीचे उमेदवार श्री अशोक नेते, व डॉ किरसान ,यांनी भेट दिली तसेच गडचिरोलीचे आमदार डॉ होळी साहेबांनी, सुद्धा भेट दिली व दर्शन घेतले.
सायंकाळी भगवान श्री राम यांची गडचिरोली शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली,या प्रसंगी कार सेवकांनी आपले अनुभव कथन केले.
या प्रसंगी वि ही प जिल्हा मंत्री शंकरजी बोरकर, सह मंत्री रमेशजी बोदलकर, सुशील हिंगे यांनी यथोचित मार्गदर्शन केले, प्रखंड मंत्री अनुपजी असाटी,प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर, सहसंयोजक सुयोगजी गुरूनुले , सुरेश भांडेकर अँटीकरपशन ब्युरो सेक्रेटरी,माजी नगर सेवक मुक्तेश्वर काटवे पद्माकर पीपरे,महेश भांडेकर ,भारत भांडेकर , पवन भांडेकर ,गणेश जूवारे,कैलाश भांडेकर,मनोहर भांडेकर,उमाजी बारसागडे सुरेश नैताम,गोसाई पिपरे,महादेव बोबाटे,प्रकाश भुरले,कुणाल भांडेकर इत्यादी लोकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले,मंदिराचे अध्यक्ष मनोहर भांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होत.