पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला महाराष्ट्र दिन

72

गडचिरोली:ता,१ मे

पोलिस अधीक्षक यांचे हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आज पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे मा. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठिक 06.45 वा. पार पडला.

 

 

  •    यावेळी सर्वप्रथम पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहिद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व शहिद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिनांक 01 मे 2019 रोजी मौजा जांभुळखेडा ते कुरखेडा मार्गावर माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहिद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सन – 2023 या वर्षात उल्लेखनिय कामगिरी बजावल्या बद्दल गडचिरोली पोलीस दलातील 130 अधिकारी/अंमलदार यांना मा. पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ व शहिद कुटंुबिय यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित शहिद कुटंुबियांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मा. जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांचे हस्ते 08.00 वा. ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला, या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडुन पथसंचलन सादर करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा श्री. सुहास शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप हे उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.