महाशिवरात्रीनिमित्त वांगेपल्ली घाटावर बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

286

गडचिरोली:

अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली घाटावरील शिव मंदिराजवळ बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची लांबच गर्दी झाली होती, यात्रेनिमित्त विविध राजकीय पक्षांचे स्टॉल लावण्यात आले शित जल. साबुदाणा खिचडी, दुधाचे वाटप करण्यात आले, त्याचप्रमाणे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू अहेरी विभागातर्फे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन खास भद्राचलम वरून आलेल्या शिवलिंगाचे दर्शन व तीर्थप्रसादा चे वाटप करण्यात आले यासाठी भाविकांनी शिव मंदिरात सुद्धा गर्दी केली पोलीस बंदोबस्तात भाविकांसाठी रांगेत दर्शनाची सोय शिव मंदिर कमिटी वांगे पलीकडून करण्यात आले बारा ज्योतिर्लिंगाचे अभिषेक व विविध भजन मंडळींनी भजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला सर्व शिवभक्तांनी भजनाचा सुद्धा लाभ घेतला आंध्र प्रदेश छत्तीसगड व महाराष्ट्रातील भक्ताने यात्रेचा परिसर दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी ओम नमः शिवाय जय घोष करण्यात आला.