शेतात खुरपणीसाठी गेलेल्या वृद्ध महिलेला वाघाने केले ठार

89

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २ : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात मंगळवार (ता. २) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शेतात काम करत असलेल्या वद्ध महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कुंदा खुशाल मेश्राम (वय ६२), असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना शेत तलावाजवळील पाणी वाहून जाण्याच्या अरूंद वाटेवर घडली. मंगळवारी सकाळी ११ वाजात कुंदा मेश्राम खुपरपणीसाठी शेताकडे गेल्या होत्या. दुपारी ४ वाजता दरम्यान त्यांचा नातू किसन त्यांना आणण्य्साठी शेतात गेला. मात्र त्याला आजी कुठेही दिसली नाही. त्याने धाव घेत घरी येऊन इतरांना याबाबत सांगितले. त्यानंतर कुटुंबीय व नातेवाइकांनी शोध घेतला असता शेत तलावापासून काही अंतरावर कुंदा मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे कुंदा मेश्राम यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परीवार आहे.या घटनेने परीसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

—————————————