गडचिरोली: 24 ,मार्च
भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकांचे उमेदवारांच्या पाचवी यादी जाहीर केलेली आहे.त्यात महाराष्ट्रतील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली .यात गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेते यांची लढत महविकास आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्याशी होणार आहे.
अशोक नेते हे19 99 ते 2009 अशी 10 वर्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते.त्यानंतर 20 24 पासून आजतागायत खासदार आहेत.आत्ता पक्षांनी त्यांना पुन्ह उमेदवारी दिलीं आहे.
- गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदार.संघातून अशोक नेते यांचसह अजून काही नावाची चर्चा सुरू होती.परंतु भाजपने अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी देऊन सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला .