ता.भामरागड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा भामरागड येथील भगवंतराव आश्रम शाळेच्या पटांगणात मंत्री मान.धर्मराव बाबा आत्राम व खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.
गडचिरोली दि.५एप्रिल २०२४
आज दि.०४ एप्रिल रोज गुरूवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ तालुका भामरागड येथे भगवंतराव आश्रम शाळेच्या पटांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या जाहीर सभेला महायुतीचे उमेदवार तथा खा.अशोक नेते यांनी संबोधीत करतांना म्हणाले ही निवडणूक तुमचं आमचं तालुक्याचं,जिल्ह्याचं,राज्याचं देशाचं भवितव्य ठरवणारी आहे.या देशाला प्रगती पथावर व सुजलाम्, सुफलाम् बनवायचे असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनवायचे आहे.यासाठी येणाऱ्या १९ एप्रिल ला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.
याबरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना कार्यान्वित करत आमलात आनण्याचे काम केले.केंद्र शासनाच्या संपुर्ण योजना व केलेल्या विकास कामाची माहिती देत अब कि बार चारसौ पार,फीर एक बार मोदी सरकार असा विजयी संकल्प करा व भरगच्च मताने मला विजयी करा असे प्रतिपादन खा.नेते यांनी या जाहीर सभेच्या निमित्ताने आयोजित सभेला संबोधीत केले.
यावेळी प्रचार सभेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलतांना पंतप्रधान यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वावर पुन्हा नरेंद्र मोदी जी ना पंतप्रधान बनवायचे आहे. व जगाला एक नंबर आणायचं असेल तर तर मोदीजी पंतप्रधान होणे गरजेचे आहे.हे सरकार शेतकऱ्यांचे आहे,महिलांना योग्य न्याय देणारे सरकार आहे.एस.सी.,एस.टी ला अधिकार देऊन न्याय देणारे सरकार आहे.तिन्ही पार्टी एकत्रीत येऊन महायुती बनवली आहे.त्यामुळे आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांना १९ एप्रिल ला कमळाच्या चिन्हावर मतदान करुन निवडुन आणायचे आहे असे प्रतिपादन या भव्य प्रचार सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म़त्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहै
या जाहीर सभेच्या निमित्ताने भामरागड शहरातील चौकापासून ते सभा स्थळी पर्यत आदिवासी परंपरेनुसार वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात नृत्येसह मंत्री महोदय मा. धर्मराव बाबा आत्राम व खा.अशोक नेते यांचे स्वागत केले.
या जाहीर प्रचार सभेच्या बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ऋतुराज हल्लगेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिशवास,भामरागडचे नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका, भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन बापुजी आलाम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लालसू आत्राम, जेष्ठ आदिवासी सेवक सबरबेग मोगल,तालुका महामंत्री तपेश हलदार,तालुका शहराध्यक्ष सम्राट मल्लीक,तालुका उपाध्यक्ष जाधव हलदार,माजी सभापती निर्मला साळवे तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.