- गडचिरोली, ता. ५ : मंगलमय सण गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला मराठी नवीन वर्षाच्या स्वागत करिता गीता ताई हिंगे आणि माणिक ताई ढोले यांचा नेतृत्वात नऊवारीसह मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत ८ एप्रिल रोजी महिलांच्या भव्य स्कूटी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोमवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या भव्य स्कूटी रॅलीत शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले .या रॅलीचा प्रारंभ स्थानिक साई मंदिर येथून होईल आणि समारोप राधे बिल्डिंग समोर होणार आहे. या रॅलीत महिलांनी नऊवारी, नथ व फेटा अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी व्हायचे आहे. फेटे बांधण्यासाठी सर्वांनी साई मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहायचे आहे. या उपक्रमाच्या अतिरिक्त माहितीसाठी गीता हिंगे.
- 9168164441, सुनीता साळवे 94231 22934, विजया मने 94217 34434, सुलभा धामोडे 76662 34408, माणिक ढोले 94229 06308, उज्ज्वला वालोदे 93737 82313 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
- ————————–