गडचिरोली, ता. ६ : गडचिरोली जिल्हा हा वनसंपत्ती, खनिज संपत्तीने f नेते यांनी खासदार म्हणून अनेक कामांसाठी सातत्रोली जिल्हा सुजलाम् सुफलाम् करणार : केंद्रीय मंत्र सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस -आरपीआय-पीरीपा महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. पुढे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, या जिल्ह्यातील रस्त्याच्या सोयी, वैद्यकीय सुविधा, पुलांची उभारणी, सिंचनाच्या सोयी, मोबाईल फोनची कनेक्टिव्हिटी, रोजगार अशा सर्वच बाबतीत कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे हा जिल्हा समृद्ध, संपन्न महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत पहिल्या क्रमांकावर राहील. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी यांचे जीवन बदलण्याकरिता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ताकद लावून अशोक नेते यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अशोक नेते यांना विजयी करण्याचे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगात देशाला नंबर वन करायचे असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणणे गरजेचे आहे, असे सांगत गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल सांगितले. जिल्ह्यातील रेल्वेमार्गाची मंजुरी, सिंचनाच्या सुविधा, मेडिकल कॉलेज, हवाई धावपट्टी, सुरजागड प्रकल्प आदी कामांत माझा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे उमेदवार बाहेरचे पार्सल आहेत. या लोकसभेत त्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेल्या आणि तुमच्याशी नाळ जुळलेल्या उमेदवाराची निवड करा, असे आवाहन खासदार नेते यांनी केले. या प्रचारसभेच्या प्रारंभी भाजपचे युवा नेते स्व.स्वप्निल वरघंटे यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, डॉ.चंदा कोडवते, युवा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, रोशनी वरघंटे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निकू नैताम, शहराध्यक्ष सोपान नैताम, नगरसेवक राहुल नैताम, लौकिक भिवापुरे, दिलीप चलाख, सुरेश शहा, मधुकर भांडेकर, निखील धोडरे, यश गण्यारपवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.