पालकमंत्री म्हणून या क्षेत्रांत अनेक विकासाचे कामे मार्गी लावले.खासदार अशोक नेते.

66

पालकमंत्री म्हणून या क्षेत्रांत अनेक विकासाचे कामे मार्गी लावले.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन.

महिला मेळावा छत्रपती शिवाजी संकुल देवरी येथे आयोजित.

 

गडचिरोली ,दि.०७ एप्रिल २०२४

(देवरी)आज दिंनाक ६ एप्रिल २०२४ रोज शनिवारी भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिवसाचे औचित्य व महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभा तसेच महिला व महायुतीचा मेळावा छत्रपती शिवाजी संकुल देवरी येथे आयोजित करण्यात आले होते.

या मेळाव्याला महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी‌ बोलतांना या देशाचे लाडके पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात महिला सुरक्षित व महिलांना सन्मान मिळाला आहे. महिला‌ सशक्तीकरण, तिन तलाख,नारी शक्ती वंदन अधिनियम,मातृवंदना, सौभाग्यवती,सुकन्या योजना,महिला प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, अशा अनेक योजना महिलांसाठी मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला मुख्य प्रवाहात येण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अंमलात व कार्यान्वित केलेले आहेत.महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.

केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.येणाऱ्या १९ एप्रिल ला कमळ या बोधचिन्हावर मतदान करून विजयी करावे. अशी विनंती मतदार बंधु भगिनींना करतोय. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी या महिला मेळाव्याला प्रसंगी प्रतिपादन केले.

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम* यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हणाले राज्य शासन सुद्धा महिलांच्या सन्मानासाठी कटीबद्ध असून लेक लाडकी ही योजना अतिशय चांगली योजना आहे याचा सुद्धा अनेक नागरिकांना फायदा होत आहे. महिला सशक्तिकरण व मेळावे सुद्धा शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी आयोजित केले गेले.मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ६ सहा ब्रिजचे उद्घाटन केलेले असुन याबरोबरचं डिपिडिसी च्या माध्यमातून अनेक विकासाचे कामे मार्गी लावले आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखले जातो. यात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते सुद्धा मी सोडवले आहे.केलेल्या विकास कामावर आपण येणाऱ्या १९ तारखेला मतदान करून कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे प्रतिपादन यावेळी केले.

मंचावर प्रामुख्याने अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ,माजी आमदार केशवराव मानकर,माजी आमदार भैरसिंहजी नागपुरे,माजी आमदार संजयजी पुराम,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी.जि.प. अध्यक्ष विजय जी शिवणकर, जिल्हाध्यक्ष अँड.येशूलाल उपराडे, संपर्क प्रमुख विरेंद्र जी अंजनकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस,प्रदेश उपाध्यक्ष शालीनी डोंगरे, जिल्हा महामंत्री अनिल येरने, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम,पं.स.सभापती अंबिका बंजार, नगराध्यक्ष संजय उईके, तालुकाध्यक्ष प्रविण दहीकर, जेष्ठ नेते तथा कृषी उ.बा.स.सभापती प्रमोद संगीडवार, उपनगराध्यक्षा प्रज्ञा संगीडवार,अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण तसेच या मेळाव्याला महायुतीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.