सपने नहीं हकीकत बुनते,तभी तो सब मोदी को चुनते.

67
  • भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा सिरोंच्या तालुक्यातील विविध गावात लोकसभा निवडणूकीत प्रचाराचा झंझावात.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री.अशोक नेते यांच्या प्रचारासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी काल जिल्ह्याचे शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील विविध गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला, अशोक नेतेच्या विजयासाठी राजेंनी अनेक कॉर्नर सभा घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करतो आहे. विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करून मोदीजींना पाठिंबा दर्शवावा. अशोक नेते यांना मत म्हणजे मोदीजींनाच मत.त्यामुळे सिरोंचा तालुक्यातुन जास्तीत जास्त मताधिक्य देत अशोक नेते यांना विजयी करून मोदीजींचे हात बळकट करूया,असे आवाहन या प्रसंगी केले.

 

यावेळी परिसरातील विविध समस्यांवर गावकऱ्यांशी राजेंनी संवाद साधला.