भाजपा जिल्हा कार्यकारणीच्या विस्तृत बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
बैठकीला विधान परिषदेचे आमदार प्रवीणजी दटके व उपेंद्रजी कोठेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन
दिनांक ५ ऑगस्ट गडचिरोली
गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या इतिहासात आजपर्यंत कधी नव्हे एवढी कामे आपल्या आमदारकीच्या १० वर्षाच्या कार्यकाळात झालेली आहेत. सोबतच केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय नक्कीच आपला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्हा कार्यकारणी समितीच्या विस्तृत बैठकीला उपस्थित जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र जी कोठेकर विधान परिषदेचे आमदार प्रवीणजी दटके, आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी खासदार अशोकजी नेते, लोकसभा संयोजक किसनजी नागदेवे ,सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, डॉक्टर चंदा कोडवते, लोकसभा समन्वय प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम , जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , यांचे सह मान्यवर उपस्थित होते