ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. २४: सरकारने राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रूज होण्याचे आदेश अविश्यांत पांडा यांना दिले आहेत. तसेच त्यांच्या पदावर रूजू होण्याचे आदेश विद्यमान जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिले आहेत.
अविश्यांत पांडा हे नागपूर येथे वस्त्रोद्योग विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांची गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच गडचिरोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी संजय दैने यांची शासनाने नागपूर वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त या पदावर नियुक्ती केली आहे. गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा हे २०१७ च्या तुकडीचे तेलंगणा कॅडरचे आयएएस आॅफिसर आहेत. नंतर त्यांची बदली महाराष्ट्र कॅडरमध्ये करण्यात आली होती.
——————————