ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता२३ : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केलेल्या प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी नागरिकांशी संवाद साधत ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नगराध्यक्षपदावर निवडून आल्यास, शहरातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्यावर प्राधान्य दिले जाईल, असे निंबोरकर यांनी सांगितले. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याच्या अनियमितता, कमी दाबाने पाणी येणे, जुन्या पाईपलाइनमधील गळती आणि पाणीगुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
नागरिकांनीही स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी ही प्राथमिक गरज असल्याचे स्पष्ट केले. शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पाणीपुरवठा, वितरण चक्र आणि गुणवत्ता यांचा सविस्तर आढावा घेतला गेला.
एकूणच, ‘हर घर जल’ अंतर्गत स्वच्छ पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही शहरवासीयांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू बनली आहे, आणि आगामी नगरपरिषद कार्यकाळात ही बाब प्राधान्याने हाताळली जाईल, असा सर्वसाधारण अंदाज व्यक्त केला जात आहे.











