सर्वांच्या प्रत्येक हाकेला तत्पर असणारा…मनमिळाऊ…आपल्या हक्काचा…आपला माणूस…प्रभाग क्रमांक ११ अनिल पुष्पाताई तुकारामजी तिडके

69

 

 

 

https://uniqueprachar.com/profile/g 4

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. २७ : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार युवा, तडफदार व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ता अनिल तिडके यांचा प्रभाग क्र.११ मध्ये जबरदस्त झंझावात सुरू आहे. आतापर्यंत आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसेवा करणारे अनिल तिडके आता थेट जनतेचा आशीर्वाद घेत नगर परीषदेत जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उच्च शिक्षित व विनम्र स्वभावाचे अनिल तिडके भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच गडचिरोलीच्या युवा गर्जना फाउंडेशनचे अध्यक्षसुद्धा आहेत. गडचिरोलीतील जनतेच्या हक्कासाठी ते सातत्याने लढत आले आहेत. आपल्या जनविकासाच्या व शहर विकासाच्या नव कल्पना सत्यात उतरविण्यासाठी ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. दरवर्षी शहरातील सर्वांत मोठा दहीहंडीचा कार्यक्रम आणि नवरात्रोत्सवाचा भव्य उत्सव त्यांच्या कुशल नेतृत्वात आयोजित करण्यात येतो. हे दोन्ही उत्सव केवळ उत्सव राहिले नसून गडचिरोली शहराची सांस्कृतिक ओळख झाले आहेत. शहरवासींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या हक्काची बाजू मांडण्यासाठी आपल्यातलं सर्वसाधारणपण जपताना आपली लढावू वृत्ती व लोकांच्या कल्याणाची क्षमता प्रत्यक्षात दाखवण्याची संधी त्यांना भारतीय जनता पक्षाने उपलब्ध करून दिली आहे. आता जनतेनेही त्यांना आशीर्वादाद्वारे संधी दिल्यास ते संधीचे सोने नक्कीच करतील. आपल्या हक्काचा, आपला माणूस अशी त्यांची गडचिरोलीत ओळख आहे. २४ तास लोकांसाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, अशा मोजक्या संवेदनशील तरुणांपैकी ते एक आहेत. अनेक होतकरू युवकांचा आदर्श आहे. शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राची उत्तम जाण असलेला युवा नेता म्हणूनही शहरवासी त्यांना ओळखतात. प्रभाग ११ च्या सर्वांगीण विकासाचा, पायाभूत सुविधांचा संकल्प त्यांनी केला आहे. हे केवळ आश्वासन नाही सत्यात उतरवण्याची हिंमत आणि पूर्ण क्षमता असलेला हा उमेदवार आता जनताजनार्दनाकडे नतमस्तक होत आशीर्वाद मागत आहे. मी नवीन नेता नाही, नवा विचार आहेत. माझे ध्येय सत्ताप्राप्ती नाही, तर सकारात्मक परिवर्तन आहे, असे ते आवर्जून सांगतात. सध्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये त्यांच्या गृहभेटी व नागरिकांशी संवाद सुरू असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. नागरिकही घरातील सदस्याप्रमाणे त्यांचे स्वागत करून मनमोकळा संवाद साधत आहेत.

———————–