प्रभाग क्र. ५ मध्ये सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांचा नागरिकांशी सुसंवाद

49

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता. २७ : जिल्ह्यातील तिनही नगर परीषदांच्या निवडणुकांची धूम असताना गडचिरोली नगर परीषदेतील अनेक उमेदवार जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चर्चेत आहेत. अशापैकी एक सीमा राहुल कन्नमवार (कोसे) या धडाडीच्या, कार्यतत्पर व गुणी उमेदवार असून त्या गृहभेटींवर भर देत नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत.

 

गडचिरोली शहरातील प्रभाग क्र. ५ हा एक महत्त्वाचा प्रभाग असून येथील विविध समस्या सोडवण्यासह शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी सीमा राहुल कन्नमवार (कोसे) नागरिकांचा आशीर्वाद प्राप्त करत प्रभागातील प्रत्येक घराला भेट देत आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच उत्साही सहभाग असलेल्या व जनतेच्या समस्यांप्रति संवेदनशील असलेल्या सीमा राहुल कन्नमवार (कोसे) जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देत असून त्यांच्या तशी पूर्ण क्षमता असल्याचे नागरिकही म्हणत आहेत. म्हणूनच त्यांची सक्रियता, सक्षमता तसेच शहरविकासाप्रतीची आस्था लक्षात घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रभाग क्र. ५ मधुन उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गडचिरोली नगर परीषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू असताना त्यांच्या नेतृत्वात सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांनीसुद्धा प्रभागात कमळ फुलवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या गृहभेटींच्या माध्यमातून नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतानाच या सर्व समस्या सोडवण्याबद्दल आश्वस्त करत आहेत. नागरिकही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत असून त्यांच्या आगमनाने परीसरात चैतन्य निर्माण होऊन त्यांच्या कार्याचे कौतुकही होत आहे. प्रभागासह शहरातही सर्व परीचित असलेल्या सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून त्यांच्या उमेदवारीमुळे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आपल्याच घरची लेक शहराच्या विकासासाठी सज्ज झाली असून तिला आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी, असे त्यांनी सांगितले.

————————————–