ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, दि. २७ नोव्हेंबर २०२५ : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ०८ मध्ये नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य रॅली काढण्यात आली. श्री हनुमान मंदिर परिसरातून निघालेल्या या रॅलीत शेकडो कार्यकर्ते, महिला बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीनंतर प्रभागातील घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रणोतीताईंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, सुव्यवस्था आणि जनतेची सेवा हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध शासकीय योजनांची माहिती देत “२ डिसेंबरला कमळाची बटण दाबून प्रभाग ८ ला प्रचंड बहुमताने विजयी करा” असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभागातील भाजपाचे अधिकृत नगरसेवक उमेदवार शिल्पाताई उद्धव गव्हारे आणि शेखरजी प्रभाकर आखाडे यांनाही पॅनल टू पॅनल विजय मिळवून देण्याची बांधिलकी नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगून सर्व उमेदवारांना ताकदवान पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला भारतजी खटी, अंकितभाऊ गव्हारे, अंकुशभाऊ हेमके, सुरेशजी भांडेकर, निखिलभाऊ गोरे, अभिजितभाऊ दांडेकर, नितीनभाऊ काळे, तेजसभाऊ साळवे, गोलूभाऊ साळवे, कालिदासजी जराते, महेशभाऊ धात्रक, गंगाधरजी टिंगुसले, योगेशभाऊ कुडवे, सुरेशजी मेश्राम, दिवाकर कांबळे, योगेश कुळवे, प्रसादभाऊ कवासे, चेतनभाऊ भांडेकर तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व महिला मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी “चला, एकत्र येऊया… गडचिरोलीच्या उज्वल भविष्यासाठी कमळाची बटण दाबून प्रचंड बहुमताने विजय मिळवूया” असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.











