प्रभाग क्रमांक १२ मधून निखील चरडे यांचा जनसंपर्क वेगात

222

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २९ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परीषद निवडणुकांना रंग चढत असताना प्रभाग क्रमांक १२ मध्ये निखील चरडे यांच्या जनसंपर्काला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिसरातील नागरिक, युवक वर्ग, तसेच विविध सामाजिक घटकांकडून त्यांना मिळत असलेले समर्थन दिवसेंदिवस वाढत असून प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

निखील चरडे यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांतून जनसंपर्क वाढवला असून त्यांच्या कामाची दखल घेऊन नागरिक त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत. परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, तसेच महिलांसाठी सुरक्षेची हमी या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केल्याने लोकांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल आशावाद वाटत आहे. प्रभागातील नागरिकांनी सांगितले की, “निखील चरडे हे प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. आमच्या प्रभागासाठी आवश्यक असलेले बदल घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे,” निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निखील चरडे यांचा प्रचार जोरात सुरू असून रस्त्यांवर, चौकात, तसेच घराघरांत त्यांचे स्वागत होत आहे. जनतेच्या प्रतिसादावरून त्यांच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये यंदा उत्साहपूर्ण आणि विकासाभिमुख निवडणूक रंगणार असल्याचे नागरिकांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे.

——————————–