गडचिरोली : प्रभाग क्रमांक १२ मध्ये साक्षी आकाश बोलूवार (काटवे) यांच्या उमेदवारीला उत्साहवर्धक प्रतिसाद

188

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली – नगरपरिषद निवडणुकीचा माहोल रंगत असताना प्रभाग क्रमांक १२ मध्ये साक्षी आकाश बोलूवार (काटवे) या नव्या उमेदवाराच्या प्रवेशाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महिलांसोबत युवकांचा वाढता सहभाग आणि जनसंपर्कादरम्यान उमटणारा उत्साह यामुळे त्यांच्या उमेदवारीला चांगले जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

 

साक्षी आकाश बोलूवार(काटवे) यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रभागातील विविध समस्यांवर लक्ष वेधत नागरिकांची मते ऐकून घेतली आहेत. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि महिला-सक्षमीकरण या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना पटत असून त्यांच्याकडून अपेक्षित बदल घडू शकतात, असा नागरिकांचा विश्वास आहे.

 

प्रभागातील महिलांनी सांगितले, “साक्षी ताई आमच्या प्रत्येक समस्येला समजून घेते. आमच्या प्रभागात महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि विकासाची दिशा त्यांनीच देऊ शकतील,” असे अनेकांनी मत व्यक्त केले.

 

घराघरातील भेटी, संवाद सभा आणि युवकांशी केलेल्या चर्चांमुळे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अनेक कुटुंबांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचेही दिसून येते.

 

प्रभाग क्रमांक १२ मध्ये साक्षी आकाश (काटवे) यांच्या उमेदवारीमुळे महिला नेतृत्वाला नवी चालना मिळाली असून यंदाची निवडणूक अधिक रंगतदार व विकासाभिमुख होणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये दिसत आहे.