जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती*

222

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली दि. ३०: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम १७ (१)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने गडचिरोली नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १अ , ४ब आणि ११ब तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०अ या चार ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून येथील निवडणूक सुधारित कार्यक्रम नुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.