ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता.३ : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या तिन्ही नगर परिषदांच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन आपले कर्तव्य बजावले त्याबद्दल माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा गडचिरोली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख, गडचिरोली, प्रशांत पुंडलिकराव वाघरे, सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान आपण मला, भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना व माझ्या पक्षाला जे प्रेम आणि विश्वास दिला, त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील, या काळात माझ्याकडून किंवा कार्यकर्त्यांकडून अजाणतेपणे कोणाचे मन दुखावले गेले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहोत!
प्रशांत पुंडलिकराव वाघरे
माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा गडचिरोली
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख, गडचिरोली
——————————————-











