पोस्टे अहेरी पोलीसांनी देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

76

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली: दि 16

जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 15/05/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा आल्लापल्ली येथे  योगेश अरुणसिंग चव्हाण नावाचं व्यक्ती  देशी विदेशी दारुची अवैध दारु विक्री करीत आहे. अशी गोपनिय बातमी  मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. वाघमोडे, पोउपनि काळे, व पोलीस स्टाफसह पोस्टे अहेरी येथून सदर ठिकाणी रवाना झाले. पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच आरोपी योगेश चव्हान याच्या घराच्या अंगणात एका मारुती सुझुकी कंपनीचे वाहन क्र. एम.एच.–34-ए.एम.–8549 या चारचाकी वाहनामध्ये एकुण 4,57,200/- रुपयांचा दारुच्या पेट्यांनी भरलेला मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.

यासोबतच आलापल्ली येथील दोन व्यक्ती चारचाकी वाहनातुन दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदारांकडुन खात्रिशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाद्वारे मौजा आलापल्ली परिसरात वाहणाची पाहणी करित असतांना दोन.व्यक्ती संशयास्पद हालचाल करतांना दिसून आल्याने त्यांचेशी विचारपुस करण्यासाठी जवळ जात असतांना सदर दोन्ही व्यक्ती पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी पोलीसांनी वाहनाजवळ जागीच दोघाना पकडले. त्यानंतर त्यंाची विचारपुस केली असता, त्यांचे नाव 1) गुड्डु वर्मा, रा. चंद्रपुर 2) अरविंद हिरामण भांडेकर, रा. येवला तह. व जि. गडचिरोली असे सांगितले व त्यांच्याकडे असलेली एक टाटा कंपनीची इंडीका विस्टा पांढ­या रंगाची चारचाकी वाहन क्र. एम.एच-32-सी.-6050 व टर्बो कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम.एच-24-जे.-9564 या दोन्ही वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये देशी विदेशी कंपनीची अवैध दारु मिळून आल्याने वाहनासह एकुण किंमत 15,98,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा. आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा. चंद्रपुर हा त्याचा पार्टनर असल्याचे निष्पन्न झाले. वरील प्रमाणे एकुण 20,55,200/- (अक्षरी – वीस लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये) रुपयांचा अवैध मुद्देमाल विनापरवाना विक्रीकरीता वाहतुक करतांना मिळुन आल्याने वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरच्या दोन्ही कार्यवाह्या मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि. वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोहवा/लोहबंरे, पोहवा/बांबोळे, चापोहवा/मोहुर्ले, पोअं/वडजु दहिफळे, पोअं/उध्दव पवार व पोअं/सुरज करपेत यांनी पार पाडल्या.