- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
- चामोर्शी, ता. २७ : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चामोर्शी येथील युवकांना सरावासाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, याकरिता आमदार डॉ. देवरावी होळी यांनी आर्थिक मदत केली. तसेच यथायोग्य सहकार्य करण्याचे आश्वासन देत अधिकाधिक तरुण पोलिस भरतीमध्ये पात्र व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.
- सोमवारी सकाळी पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सराव मैदानावर जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी या पोलिस होण्यास इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आवश्यक कोणते, कोणते साहित्य लागते, याविषयी माहिती घेत ते साहित्य खरेदी करण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत केली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक पुल्लूरवार, भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युवा नेते प्रतीक राठी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.