ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २८ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने दहावीच्या निकालात यशाची उंच भरारी घेतली आहे.
या परीक्षेला महाविद्यालयाचे ७० विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १२२, द्वितीय श्रेणीत ७६, उत्तीर्ण श्रेणीत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ९६. ९३ टक्के लागला असून प्रथम पुर्वा वसंत काटे ९६ टक्के, द्वितीय गौरव सुनिल कुत्तीरकर ९३. ६० टक्के, तृतीय कांचन यशवंत मेश्राम ९०. ८० टक्के गुण घेतले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसोबत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव जी. व्ही. बानबले, ज्येष्ठ सदस्य ए. टी. मुनघाटे, डी. एन. चापले, एस. पी. पाटील ब्राह्मणवाडे, प्राचार्य सी. के. राऊत आदी उपस्थित होते. या गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे पदाधिकारी, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संचालन श्याम भरें, आभार डी. आर. चौधरी यांनी मानले.