- गडचिरोलीतील सिताराम नगर व झाशी नगर येथील ७० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आ.डॉ.देवरावजी होळी यांनी केले लोकार्पण.
- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली.दि २२ जून
गडचिरोली शहराच्या विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून भूमिपूजन केलेल्या कामांचे आज लोकार्पण करीत असल्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावजी होळी यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील सिताराम नगर व झाशी नगर येथील ७० लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करताना केले.
याप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे, युवा मोर्चाचे मधुकरराव भांडेकर , शहराच्या महिला आघाडी अध्यक्ष कविताताई उरकुडे ,नगरसेवक केशवजी निंबोड , माजी नगरसेवक विजयराव गोरडवार, वासुदेवराव बट्टे, शहर महामंत्री विनोद भाऊ देवोजवार ,महामंत्री विवेकजी बैस, राजू शेरकी, श्याम वाढई , अर्चनाताई निंबोड, स्वातीताई चंदनखेडे, स्थानीक रहिवासी संदीप बोदलकर, राहुल मेश्राम, मोहन मस्के, बाबुरावजी लोंढे, सपना कन्नाके ,भास्कर कानपल्लीवार, विकास सातपुते, मायाताई सातपुते, रवी गायकवाड अरविंद पेद्दिवार यांचेसह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.