भाजप महिला मोर्चाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” उपक्रमाला सुरुवात

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाला सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेने गडचिरोली येथेही या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १११ व्या भागामध्ये जनतेला एक वृक्ष स्वतःच्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या अध्यक्षतेत मातोश्री वृद्धाश्रम परिसरामध्ये “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी भाजप महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने लावण्याचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवावे, असे आवाहन केले. याप्रसंगी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंदा कोडवते, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव रंजीता कोडापे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे, नीता वडेट्टीवार आदी उपस्थित होत्या.