ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : स्थानिक आयटीआय चौक ते पंचवटीनगर या मुख्य रस्त्यावर नगर परिषदेकडून गटार लाइन दुरुस्तीचे काम करून खोदकाम करण्यात आले. पण रस्त्याची दुरुस्ती नीट न केल्याने या रस्त्यावर दीड फूट खोल खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गटार लाइन दुरुस्तीच्या खोदकामानंतर या रस्त्याच्या भागात सिमेंट-काँक्रिट वापरता रवाडी बोल्डर, चुरी टाकून रस्ता दुरुस्ती करण्यात आली. मात्र आता येथे दीड फूट खोल खड्डा पडला आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नगर परीषद प्रशासन नागरिकांचा अपघात होऊन जीव जाण्याची वाट बघत आहे काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.
————————————–