आदिवासी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता आ. डॉ. देवरावजी होळी

52

गडचिरोली येथे “कोया किंग अँड क्वीन” कार्यक्रमाचे उद्घाटन

 

कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ४ ऑगस्ट गडचिरोली

 

आदिवासी परंपरा संस्कृती भाषा यांचे जतन होणे आज आवश्यक झाले असून भविष्यातील आपल्या आदिवासी मुलांना आपल्या भाषा ,संस्कृतीचे जतन व पालन करता यावे यासाठी आदिवासी संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील “कोया किंग अँड क्वीन” या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले.

 

यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

 

नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली व आदिवासी सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लेव्हल ट्रायबल कल्चरल मॉडलिंग कॉम्पिटिशनच्या वतीने कोया किंग अँड क्वीन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

नव्या पिढीतील आदिवासी युवक युवतींना आपल्या आदिवासी रूढी, परंपरा, बोली-भाषा ,संस्कृती याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी या संस्कृतीचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडून येते त्यामुळे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणारे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी याप्रसंगी म्हटले.