ग्लोबल गडचिरोली न्यूज,
आरमोरी, ता. २० : येथील शिवम रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीस दोन युवकांनी मारहाण केल्या प्रकरणी २० आॅगस्ट रोजी आरमोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सर्वपक्षीय महाआक्रोश मोर्चाही काढण्यात आला.
शिवम रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीस दोन युवकांनी व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या इतर समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनी घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी आरमोरी शहर कडकडीत बंद करण्याचे आवाहन सर्वपक्षीयांनी केले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजतापासून सर्व दुकानदार चालकांनी आपली दुकाने १०० टक्के पूर्णपणे बंद ठेवली होती. मारहाण झालेल्या युवतीच्या समर्थनार्थ सकाळी ९ वाजता आरमोरी येथील वडसा टी पॉइंटवर हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीचे स्वरूप महामोर्चात झाले. सर्वप्रथम आमदार कृष्णा गजबे व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्रोत म्हणून व जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, असे नारे देत आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मोर्चातील नागरिकांनी आरोपींच्या विरोधात नारेबाजी केली.
हा मोर्चा टी पॉइंट येथून सुरू होऊन राज्य मार्गावरील मुख्य रस्त्याने इंदिरा गांधी चौकात येताच जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आमदार गजबे यांनी युवतीच्या मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी सोहेल याची पत्नी असून तिला पोलिसांनी अटक करावी, तसेच आरोपी सोहेलने दंगा करण्यासाठी बोलविलेल्या १५ साथीदारांना दोन दिवसांत अटक करावी, अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने ठाणेदारांना निवेदनाद्वारे केली.परंतु नागरिकांचे समाधान न झाल्यामुळें आक्रमक झालेल्या मोर्चेकरूंनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनकडे वळवला. पोलिस स्टेशनच्या गेटजवळ मोर्चा येताच आरमोरी पोलिसांनी गेट जवळ तगडा बंदोबस्त ठेवला. यावेळी मोर्चेकरूंनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या , आरोपींना फाशी द्या, अशी नारेबाजी केली. यावेळी ठाणेदारांनी आरोपीवर कडक कारवाई करणार, असे आश्वासन देताच मोर्चेकरूंनी आपला मोर्चा परत वळविला. या मोर्चात आमदार कृष्णा गजबे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, पंकज खरवडे,भारत बावनथडे, सदानंद कुथे, विलास पारधी, नंदू पेटेवार, संदीप ठाकूर, माजी जिल्हा परीषद सदस्य अमोल मारकवर, वेणू ढवगाये, लक्ष्मी मने, शंकर बोरकर, अमन गहेरवार,निखिल धार्मिक, सत्यनारायण चकिनारपवार, रणजित बनकर,अक्षय हेमके, शरद भोयर, सागर मने, श्रीहरी कोपुलवार, भूषण सातव,विजय सुपारे,अशोक चक्रवर्ती,विलास पारधी, नितीन जोध,विश्व हिंदू परिषदेचे शंकर बोरकर, शुभम निंबेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, संगीता राऊत,नीता ढोरे,गीता सेलोकर,सुनीता चांदेवार,विद्या चौधरी,योजना मेश्राम, हेमलता वाघाडे,विभा बोबाटे,राजू अंबानी,नारायण धकाते, संतोष गोंडोळे, , सुधीर सपाटे, कुणाल पिल्लारे, राहुल जुवारे,अंकुश गाढवे,राहुल तितीरमारे,अमीन लालानी,सुनील नंदनवार, सुरज कारकुरवार, अमनसिंग गहीरवार, लकी सोनेकर , शुभम चीचघरे ,पवन कुकड्कार,रमेश निंबेकर,गणेश तिजारे, चंद्रशेखर चीचघरे, धीरज बोधलकार, निहाल बोधलकर, पियुष सोनटक्के, कुणाल पिलारे, अक्षय वनमाळी,यासहित भारतीय जनता पार्टी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट), भारतीय काँग्रेस पार्टी,प्रहार संघटना, शिवसेना(उद्धव गट),शिवसेना (शिंदे गट),बजरंग दल, विश्व हिंदू परिषद,बंगाली आघाडी, युवरंग संघटना, सामाजिक धार्मिक संघटना,विविध महिला संघटना, गायत्री परिवार, पतंजली योग समिती, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते.आरमोरी शहरात जातीय दंगल घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
———————————————-