अहेरी राजनगरीग्लोबल गडचिरोली न्यूज, अहेरी:- बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण राखी पौर्णिमा नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ह्या सणाचे औचित्य साधून राजनगरी अहेरीतील इंदिरानगर प्रभाग सह इतर प्रभागातील महिलांनी काल रुक्मिणी महालात येऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांना राखी बांधून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला दणदणीत विजय होवो अश्या शुभेच्छा ह्यावेळी दिल्या..!! ह्या प्रसंगी राजे साहेबांनी ह्या महिलांशी आस्थेने संवाद साधत विविध समस्यांवर चर्चा करीत तूमचा हा भाऊ सुख दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुमचा प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते..चा लाडक्या बहिणींनी बांधली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना राखी, विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाचा दिल्या शुभेच्छा..