ग्लोबल गडचिरोली न्यूज
आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ, राहुरी, बारामती, पुणे, परभणी, यवतमाळ, वरोरा येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहेत. तसेच नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्र, गणेशखिंड जि. पुणे येथील फळ संशोधन केंद्र व अंबेजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रालासुद्धा भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जीवनमान उंचावतील. त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे. हा कार्यक्रम पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात २२ पासून ३१ आॅगस्टपर्यंत एकूण १० दिवस आयोजित करण्यात आला असून या १५व्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके, पोलिस उपनिरीक्षक सागर किटे व अंमलदारांनी परिश्रम घेतले.
————————–