राहुल गांधी मुर्दाबाद च्यां घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी केला राहुल गांधींचा धिक्कार
ग्लोबल गडचिरोली न्यूज
दिनांक १३ सप्टेंबर चामोर्शी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन भारत विरोधी वक्तव्य सतत करित आहेत. परंतु यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेले आरक्षण काँगेसची सत्ता आल्यास आपण रद्द करू असे बोलून आपला आरक्षण विरोधी खरा चेहरा समोर आणलेला आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करणारे राहुल गांधी हे आरक्षण विरोधी व संविधान विरोधी असून त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने चामोर्शी येथे राहुल गांधी मुर्दाबाद च्या घोषणा देत तीव्र शब्दात निषेध केला.*
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुक्याचे अध्यक्ष आनंद भांडेकर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुराडे,रमेश बारसागडे,काशीनाथ बुराडे,सुरेश शाहा,रमेश नैताम,रेवणाथ कूसराम, विष्णू ढाली,कविता किरमे, वासुदेव चिचघरे,रोशनी वरघंटे, नरेश अलसावार, अशोक बनपूरकर,प्रशांत येगेलोपवार,रामचंद्र वरवाडे,गीतेश बारसागडे,प्रशांत पालारपवार,गौरव गाण्यारपवार,समस्त कार्यकर्ता व पदाधीकारी उपस्थित होते.