इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात

189

  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. १८ : इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा स्थानिक गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात पार पडला.
  • कार्यक्रमाला चंद्रपूर इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्ष रमा गर्ग, सचिव अर्चना तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे स्वागत भेटवस्तू व पुष् गुच्छ देऊन करण्यात आले. इनरव्हील प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. २०२३-२४ च्या अध्यक्ष सुधा राठी यांनी मागील वर्षी घेतलेल्या प्रकल्पांचे वाचन केले. तसेच सुधा राठी यांनी यावर्षी होणाऱ्या अध्यक्ष प्रतिभा रामटेके यांना आपला कॉलर प्रदान करून अध्यक्ष २०२४-२५ चे पद देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रतिभा रामटेके यांनी विजया चव्हाण यांना सचिव पद दिले. त्यांना बॅज व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आयएसओ पिंकी राठी यांना बॅज व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सीसी शिखा काबरा यांना बॅज व पुष्पगुच्छ देऊन पद देत अभिनंदन करण्यात आले. कोषाध्यक्ष पदी वैशाली गोत्तमवार यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदी वैशाली बत्तुवार यांची निवड करण्यात आली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन सदस्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वैशाली बत्तूवार यांनी स्वागत गीत गायले. यावर्षी घेण्यात आलेले वृक्षारोपण, सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप तसेच वृद्धांना ब्लँकेट वाटप या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. दीपाली काथवटे पहिल्या अध्यक्ष २०२२-२३ यांनी पद घेऊन सुरुवात केली, हे सांगितले. त्यांचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्या रमा गर्ग म्हणाल्या की, इनरव्हील क्लब महिलांच्या क्षमता विकसित करण्याकरिता आहे. घर सांभाळून आपण समाजाची सेवा केली पाहिजे.आपले कौशल्य दाखवून पुढे येऊन आपली ओळख निर्माण केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रतिभा रामटेके यावर्षीच्या अध्यक्ष यांनी क्लबचा हेतू सांगितला. नवीन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले. या क्लबच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य मला लाभले. मी योग्य ती जबाबदारी सांभाळून हे काम करेल, असे त्यांनी सांगितले.शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय व विद्याभारती हायस्कूल कन्या विद्यालयाच्या दिव्यांग मुलांना दप्तर, वही, पेनचे वाटप करण्यात आले. यात दहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांचे पालक सोबत होते.कार्यक्रमाला निरा सारडा, मंजू काबरा, चंचल काबरा, तिलोत्तमा हाजरा, शीतल तंगडपल्लीवार, ममता शेंडे, अर्चना मानापुरे, निरा सारडा, प्रतिभा चौधरी, राजनंदिनी पळशीकर, सिंधू बारसागडे, सरस्वती पट्टानी उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी योगिता पिपरे, प्रतिभा रामटेके, यामिनी तुमराम, वैशाली बत्तुवार यांनी सहकार्य केले. दी गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार, प्राचार्य राऊत, प्राचार्य वंदना मुनघाटे यांचे आभार मानले. संचालन शिखा काबरा यांनी केले, तर आभार वैशाली बट्टूवार यांनी मानले.
  • ———————————-