दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम

52

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली,(जिमाका),दि.6: ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला.

 

महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवण्याकरिता सुचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या लोकमंगल या स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांसोबत दिवाळीतील एक दिवस जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची भेट घेवून दीपावली उत्सव साजरा करण्यात आला.

दिनांक 05 नोव्हेबर 2024 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या दालनात बालकांसोबत भेट घेवून दिवाळी उत्सव साजरा करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, तहसिलदार सुरेंद्र दांडेकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिरीश कावळे यांनी बालकांसोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेली आवड, निवड, छंद, जाणून घेतली व व्यक्तीमत्व विकास, प्रेरणादायी पुस्तकाचे नाव सांगुन वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करुन बालकांचा आंनद द्विगुणित करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद गडचिरोली येथे भेट देण्यात आली. अतिरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी बालकांना दिपावलीच्या शूभेच्छा देवून प्रशासकीय कामकाजाविषयक माहिती देवून आयुष्याला दिशा देणारी पुस्तकाचे वाचन करावे तसेच चांगल्या सवयी लावावे असे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या निवासस्थानात भेट घेण्यात आली. श्रीमती आयुषी सिंह यांनी प्रत्येक बालकासोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेलल्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यानंतर बालकांनी आयुषी सिंह यांच्या सोबत स्हेन भोजनाचा आनंद घेतला. बालकांना फराळ देवून एक दिवशीय दिपावली उत्सवाचा आनंद घेतला.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी सहकुटुंब सर्व बालकांना डायरी, पेन भेटवस्तू व फराळ देवून सहकुटुंब बालकांसोबत दिपावली उत्सव साजरा केला.

सदर उपक्रम जिल्हाधिकारी संजय दैने व मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या नियंत्रणात राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अर्चना इंगोले उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जि.प., बाल कल्याण समितीचे सदस्य काशिनाथ देवगळे, सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, उदधव गुरनुले विस्तार अधिकारी जि.प., लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष शायनी गर्वासीस, अहिल्यादेवी बालसदन घोट येथील अधिक्षिका ललिता कुज्जुर, बाल सरंक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुर, पियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अशा प्रकारे दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवून प्रशासकीय कामकाज बद्दल माहिती देवून बालकांना संबोधन केले. आणि त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने संवाद साधून प्रशासकीय अधिकारी होण्याकरिता काय करावे लागते त्याची संपूर्ण माहिती बालकांनी जाणून घेतली अशा आगळावेगळा कार्यक्रम घेवून बालकांना खरी दिपावली उत्सवाचा आनंद घेता आला. सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास विभागाने सदर उपक्रम राबविला.