ऐका हो ऐका….मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

28

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहेत.

आरमोरी, गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दैने यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

—————————————-