ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिं.१६ नोव्हेंबर २०२४
नागपूर: महान क्रांतिकारक आणि आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथे भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार मा. अशोकजी नेते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी बोलताना अशोकजी नेते म्हणाले, “भगवान बिरसा मुंडा हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होते. त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जयंतीला राष्ट्रीय स्तरावर जनजातीय गौरव दिन म्हणून साजरे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक
नेते यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन मोदी सरकारने आदिवासी समाजासाठी अनेक योजनांचा प्रारंभ केला आहे. समाजाच्या न्याय व सन्मानासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिले आहे. आज विविध विकास योजना आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रिय सांसदीय मंत्री मान.किरेन रिजिजू, धर्मपालजी मेश्राम उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, शुभाषजी पारधी पूर्व सदस्य अनुसूचित जाती आयोग भारत सरकार, मायाताई इवनाते पूर्व सदस्य अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार, अक्षय उईके प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चा भाजपा, बंटी कुकडेजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर शहर, विष्णूजी चांगदेव महामंत्री नागपूर शहर भाजपा, वरिष्ठ पदाधिकारी संदीपजी जाधव, अरविंदजी गेडाम, आकाश मडावी, वीरेंद्रशह उईके, महेंद्र उईके,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, आदिवासी समाजाचे प्रमुख नेते, तसेच अनेक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक योगदानावर चर्चा करण्यात आली. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले, याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.