जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

70

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली,(जिमाका),दि.27:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, नेहरु युवा केंद्र व एन.एस.एस., गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. सन 2024-25 या सत्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली मुख्यालयीन जिल्हास्तर युवा महोत्सवाचे व्यापक स्वरुपात व अधिका अधिक युवकांचा सदर महोत्सवामध्ये सहभाग असावा व महोत्सवाला व्यापकता यावी शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचना नुसार जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 30 नोव्हेंबर, 2024 ला जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, गडचिरोली येथे सकाळी09.00 वाजता आयोजीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

युवा महोत्सव आयोजनामागील उद्देश्‍ युवकांचा सर्वांगिन विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सप्तकलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मीता वाढील लागणे, करीता युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

तसेच सदर युवा महोत्सव हा जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजीत करण्यात येत असतो. संकल्पना आधारीत बाबीमध्ये “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” Innovation of Science and Technology सन 2024-25 या वर्षासाठी निश्चित केला असून या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरावर युवा महोत्सवात सहभागी युवकांची कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.

जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये खालील कलाप्रकार सामाविष्ठ आहेत.

संकल्पना आधिरीत स्पर्धा “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” Innovation of Science and Technology, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 1. समुह लोकनृत्य, 2. लोकगीत, कौशल्य विकासमध्ये 1. कथा लेखन, 2. चित्रकला स्पर्धा, 3. वत्कृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), 4. कवीता, युथ आयकॉन व ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग या अंतर्गत 1. Tech for Viksit Bharat, 2. Vikas Bhi Virasat Bhi, 3. Empowering Youth for Viksit Bharat, 4.Making India the Vishwaguru, 5. Making India the Startup Capital of the World, 6. FIT India – A means to Viksit Bharat, 7. Making India the Global Manufacturing Powerhouse, 8.Making India Energy Efficient, 9.Building the Infrastructure for the Future,10. Empowering Women and Improving Social Indicators या विषयावर Viksit Bharat Quiz (ऑनलाईन पद्धतीने), निबंध स्पर्धा (ऑनलाईन पद्धतीने) Viksit Bharat PPT Challenge या स्पर्धा आयोजीत होणार आहे. करीता माय भारत पोर्टलवर रजीस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

उपरोक्त सर्व बाबींच्या जिल्हास्तरावर कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत झाल्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त करणारे युवक-युवती / संघ यांना विभागस्तरावर आयोजीत विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता कार्यालयाच्या वतीने प्रवेशअर्जासह संघ / युवक युवतींना पाठविण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये युवक युवती चे वय 15 ते 29 या वयोगटातील राहील. (दि. 12/01/2025 रोजीपर्यंत वयाची परिगणना 15 ते 29 वर्षे असावी.) कमी अधिक वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येणार नाही. तसेच युवा महोत्सवामध्ये सहभागी हेणारे युवक युवती हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे राहील. तसेच संघ असल्यास शाळेचा / महाविद्यालयाचा / संस्थेचा प्रवेशअर्ज युवक युवतीच्या नावासह व जन्मतारखेसह व निवासाच्या पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करणे अनिवार्य आहे.

जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्या युवक युवतींकरीत यावर्षीपासुन प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणाऱ्या वैयक्तिक / सांघिक कलाप्रकारानुसार रोख बक्षिसे कार्यालयाच्या वतीने देण्यात येतील. तसेच सहभागी युवक युवतींना कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.

तरी जिल्ह्यातील विविध संस्था / विविध शाळा / विविध महाविद्यालये / कला क्षेत्रात कार्यरत विविध संस्था / कृषी महाविद्यालय / अध्यापक महाविद्यालय / औद्योगीक प्रशिक्षण संस्था / तंत्रशिक्षण महाविद्यालय व जिल्ह्यातील विविध युवक युवती यांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. 29/11/2024 पर्यंत आपला सहभाग या कार्यालयाचा ई-मेल आयडी dsogad2@gmail.com वर नोंदवावा (मुळ प्रत दि. 29/11/2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावी) व आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा व अधिक माहितीकरीता श्री. एस.बी. बडकेलवार, यांचेशी प्रत्यक्ष / दुरध्वनी क्रमांक 9503331133 संपर्क साधावा असे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी आवाहन केले आहे.