राखी टोली येथील कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण

302

गडचिरोली, ता. ११ : तालुक्यातील मौजा राखी टोली येथील राजे शिव छत्रपती क्रीडा मंडळाच्या सौजन्याने भव्य प्रो कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रथम बक्षीस जय गडमाता क्रीडा मंडल बोडेना कोरची, दुसरे बक्षीस राजे शिव छत्रपती क्रीडा मंडल राखी टोली , तिसरे बक्षीस शिवराय क्रीडा मंडळ विहीरगाव यांना आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राहुल पोरेड्डीवार, विकेश तुंकलवार तथा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विजेता उपविजेता संघ उपस्थित होते.

—————————–