कर्तुत्ववान नारींचा सन्मान*

303
  • भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा महिला आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक तथा नारी शक्ती सन्मान कार्यक्रम संपन्न
  • दिनांक 11 फरवरी 2024 ला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गडचिरोली शहरातील फंक्शन हॉल चामोर्शी रोड येथे भाजपा जिल्हा महिला आघाडी कार्यकारणी ची बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी बैठकीला संबोधित करताना चित्राताई म्हणाल्या की, आतापर्यंत देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली. विशेषतः महिलांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती अधिनियम, उज्ज्वल गॅस योजना, घरकुल योजना, शौचालय योजना, निरनिराळे बचत गट, मुद्रा लोन, महिलांच्या बाबतीत निरनिराळे संरक्षण व हक्क कायदे , मोफत लस ई. भरीव योजना आणल्या, पुढे बोलत असताना आज प्रत्येक गावात निरनिराळे बचत गट भवन सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मविमच्या पदाधिकाऱ्यांच्या मानधनामध्येही वाढ होणार हेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर पुढे सांगताना त्या म्हणाल्या, की गेल्या वर्षी पासून म्हणजेच ८ मार्च २०२३ ला भाजपच्या नेतृत्वात असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक महिलेला महिला दिनाचे औचित्य साधून लालपरीने म्हणजेच प्रत्येक महिलेची अर्धी तिकीट सेवा योजना सुरू केली जेणेकरून प्रत्येक सामान्य महिलेला याचा लाभ घेता यावा, आणि आज आपण बघतोय की प्रत्येक सामान्य महिला याचा लाभ आनंदाने घेत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेकडो महिलांना सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे सांगितले की आगामी काळात भाजपाला आणखी आपला पक्ष मजबूत व बळकट करणे गरजेचे आहे, त्यामुळे भाजप महिला आघाडीने आतापासूनच तयारीला लागायला हवे, पुरुष कितीही खंबीर असला तरी घर हे स्त्रीच चालवत असते, त्यामुळे महिलेने आता स्वतः सुद्धा आता स्वावलंबी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.

 

आज गडचिरोली येथे महिला मेळावा,बचत गटांच्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार,नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या उदघाटक म्हणून मार्गदर्शन करत होत्या. गीताताई हिंगे यांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात पक्ष संघटन मजबूत करण्यावर जोर दिला,मा. मोदींच्या नेतृत्वात आपल्या सर्व महिलांना काम करण्याची संधी मिळाली ही भाग्याची बाब असून आपल्या पावरफुल नेत्या चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात नियोजन बध्द कामाची सवय लागेल हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आपण सर्व गडचिरोली जिल्ह्याच्या महिलांच्या पाठीमागे सक्षम पणे उभे राहू असे प्रतिपादन केले.जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी भाजपाच्या महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्याना शुभेच्छा दिल्या आणि जिल्हाध्याक्षा गीता ताई हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली महिला आघाडीचे काम अतिशय उत्कृष्ट सुरु आहे असे म्हणून कौतुकही केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. प्रशांतजी वाघरे जिल्हा अध्यक्ष,भाजपा गडचिरोली सोबतच मंचावर अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री भाजपा महिला मोर्चा, मा.श्री बाबुराव जी कोहळे लोकसभा विस्तारक, मा.श्री प्रमोद जी पिपरे लोकसभा समन्वयक, मा.श्री प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली, सौ.योगीताताई पिपरे जिल्हा महामंत्री, सौ.रेखाताई डोळस महिला मोर्चा प्रदेश सचिव, सौ.गीताताई हिंगे जिल्हाध्यक्षा भाजपा महिला आघाडी, मा.शालिनी ताई डोंगरे ,जेष्ठ कार्यकर्त्या वच्छलाताई मुनघाटे,अर्चना ढोरे,रोशनी वरघंटे,शालिनी पोहोणेकर,त्रिशा डोईजड उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन भाजप जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके तसेच आभार प्रदर्शन तालुका अध्यक्षा रोशनी ताई वरघंटे यांनी केले.

यावेळी *प्रदेशअध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या शुभहस्ते NGO व बचत गटात तसेच इतर क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या 50 महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला* व मार्गदर्शन करण्यात आले.

  1. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, जिल्हा सचिव सिमा कन्नमवार,शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे, रश्मी बानमारे,अर्चना निंबोळ, अर्चना चन्नावार,बेबीताई चिचघरे,पुष्पा करकाडे,भूमिका बरडे,रूपाली कावळे, जयश्री मडावी, प्रतिमा सोनवणे, सुनिता आलेवार, सपना बोनगिरवार,भारती खोब्रागडे तसेच भाजपचे अन्य महिला पदाधिकारी ,बचत गटाच्या महिला, NGO कार्यकर्त्या तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.