गडचिरोली, ता. १६ : मागील ८-९ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाने मार्कंडा देवस्थानाच्या दुरुस्तीचे घेतलेले काम अजूनही सूरू न केल्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाचे अप्पर महानिदेशक आलोक त्रिपाठी यांची भेट घेऊन मार्कंडा देवस्थानाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली असता पुढील ७ दिवसांत मंदिराचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी आमदारांना दिले. या भेटीप्रसंगी आमदारांनी मार्कंडा देवस्थानाचे काम सुरू न झाल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये असलेला आक्रोश व विविध आंदोलनाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पुन्हा या मागणीचे लेखीपत्र भेटीच्या वेळी आलोक त्रिपाठी यांना दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.
————————–
,