नागरिकांच्या मदतीने संपवू नक्षलवाद – रश्मी शुक्ला

305

नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराला लागून असलेल्या गर्देवाडा आणि वांगेतुरी पोलीस मदत केंद्राला १७ फेब्रुवारीरोजी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली.

गडचिरोली : एकेकाळी नक्षल्यांचे प्राबल्य असेलल्या भागात आज पोलीस जवान पोहोचले आहे. अतिदुर्गम गर्देवाडा आणि वांगेतुरीत एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारून गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांच्या बिमोडासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्यानेच आम्ही नक्षलवाद संपवू, असा इशारा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गर्देवाडा येथे पोलीस जनजागरण मेळाव्यात बोलताना दिला.