गडचिरोली (गो वि)दि:२०
गोंडवाना विद्यापीठाच्या
- वतीने युवा साहित्य संमेलनाचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारी रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात करण्यात आले आहे.या संमेलनानिमित्त बुधवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी१० वाजता उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक व सत्कारमूर्ती ९७ वे अभा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विशेष अतिथी म्हणून डॉ. अभय बंग, प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, यवतमाळचे जागतिक साहित्य अभ्यासक प्रा. ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मीनाक्षी वाळके उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, समनव्यक मराठी विभाग तसेच संचालक रासेयो डॉ. श्याम खंडारे, समनव्यक युवा साहित्य संमेलन, स. प्रा डॉ. सविता गोविंदवार, सह-समनव्यक , स. प्रा.डॉ. हेमराज निखाडे, स. प्रा डॉ. नीळकंठ नरवाडे, स. प्रा, अमोल चव्हाण आदींनी केले आहे. दोन दिवसीय संमेलनात नव सत्र होणार असून विविध मान्यवर या सत्रांमध्ये विचार व्यक्त करणार आहेत.या दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचा समारोप दिनांक २२ फेब्रुवारी रोजी, संध्याकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होणार असून अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरु , डॉ. श्रीराम कावळे, प्रमुखअतिथी म्हणून अडयाल टेकडीचे सुबोध दादा , संपादकीय पत्रकार श्याम हेडाऊ, प्रसिद्ध वक्ते तथा लेखक डॉ. अनमोल शेंडे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन विद्यार्थी प.शै. वि.गों. वि.आभार समनव्यक युवा साहित्य संमेलन डॉ. सविता गोविंदवार करतील.सदर कार्यक्रमाचा लाभ कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे